आजकाल सर्वायकल कॅन्सर ची (Cervical Vaccine) बरीच चर्चा आहे. बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच शंका आहेत, तर त्याविषयी आपण चर्चा या ब्लॉगमधून करूया.
थोडा गोंधळ कमी करण्यासाठी, ही माहिती सोपी करण्यासाठी हा ब्लॉग दोन भागात किंवा दोन ब्लॉगमध्ये करूयात. या भागामध्ये आपण cervical vaccine विषयी माहिती घेऊयात, आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण HPV infection बद्दल माहिती घेऊयात.
विषय सोपा करण्यासाठी आपण ही माहिती प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेऊयात.
१ ) Vaccine म्हणजे काय?
तर, vaccine ची निर्मिती संसर्गजन्य आजारमुळे (Infectious diseases) झाली.
Infectious disease म्हणजे जंतूमुळे होणारे/पासरणारे आजार. जेंव्हा जंतूच्या आपल्या शरीरात शिरकाव होतो, तेव्हा त्याविरुद्ध आपले शरीर प्रतिकारशक्ती निर्माण करते. ही प्रतिकारशक्ती कमी पडली की आपल्याला तो आजार होतो. उदाहरणार्थ, फ्लूचे infection म्हणजे सर्दी, गोवर म्हणजे measles किंवा इतर viral infection आणि बॅक्टेरिया इन्फेक्शन सुद्धा.
वॅक्सीन म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेली प्रतिकारशक्ती. एखाद्या माणसांमध्ये, प्राण्यामध्ये, किंवा कृत्रिमरित्या अंड्याच्या पेशींमध्ये जंतूचा शिरकाव करून कृत्रिमरित्या प्रतिकारशक्ती बनवली जाते. ही प्रतिकारशक्ती म्हणजे antibodies किंवा antigens हे लहान लसीच्या स्वरूपात, ०.५ मि.ली. किंवा १ मि.ली. injection द्वारे आपल्या शरीरात टोचली जाते. जेव्हा खरे जंतू आपल्या शरीरात शिरकाव करतात, तेव्हा ही प्रतिकारशक्ती पूर्ण शरीरातील इतर पेशींना जागृत करून खूप मोठी प्रतिकारशक्ती त्या जंतूविरुद्ध तयार करते आणि त्या जंतूचा पूर्ण विमोड करते, नायनाट करून टाकते. त्यामुळे, त्या आजारापासून आपण बचावतो. या वॅक्सिनच्या निर्मितीमुळे आपल्या सर्वांचे आयुष्यमान वाढलेले आहे.
पूर्वी लोक गोवर, कांजण्या, डेंग्यू, डांग्या खोकला, ट्युबरक्युलोसिस आणि स्वाइन फ्ल्यू यामुळे अकाली मरण पावत होते. आताचे उदाहरण म्हणजे कोरोना. वॅक्सिनमुळे लहान मुलांचे आणि सर्व लोकांचे या आजारांपासून संरक्षण झाले आहे. वॅक्सिनमुळे आपल्या मानवजातीचे खूप संरक्षण झालेले आहे.
२ ) तर मग कॅन्सरवर व्हॅक्सिन कसे काय तयार झालं?
लोकांना वाटेल की कॅन्सर हा एक वेगळा आजार आहे. त्यावरती लस कशी तयार होऊ शकते? शास्त्रातल्या संशोधनामुळे असे लक्षात आले आहे की स्त्रियांमध्ये होणारा सर्वाइकल कॅन्सर आणि काही प्रमाणात घशाचा कर्करोग (oral cancer), गुददद्वाराचा कर्करोग (Anal cancer) यांचे उगम हा **HPV** नावाच्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये आहे. त्यामुळे ह्या Infectionचे vaccine बनवले तर आपल्याला ह्या कर्करोगापासून संरक्षण होऊ शकते, असे लक्षात आले आणि त्याचा प्रसार सुरू झाला.३ ) Cervical vaccine वॅक्सिनचे किती प्रकार आहेत?
जितके जंतूचे प्रकार, तितके वॅक्सिनचे प्रकार असू शकतात. सुरुवातीच्या काळात, सर्वाइकल कॅन्सर हा HPV – १६ आणि १८ या जंतूंपासून होतो असे आढळून आले. त्यामुळे त्यावर वॅक्सिन तयार झाली. आता HPV या जंतूचे Types ६, ११, १६, १८, ३१, ३३, ४५, ५२, ५८, सापडले असून, त्यापासून पुरुष्यामधे सुद्धा कॅन्सर होतो, असे आढळून आले आहे. आत्ता जगात HPV चे तीन प्रकारचे vaccines उपलब्ध आहेत.- सर्व्यारिक्स (cervarix) हा HPV १६,१८, दोन जंतूंबद्दलची व्हॅक्सिन आहे.
- गार्डासिल (Gardasil ) आणि सर्वावॅक (Cervavac ) हे चार HPV प्रकार विरुद्ध काम करते: HPV – ६, ११, १६, १८.
- गार्डासिल नाइन (Gardasil 9 ) हे नऊ HPV प्रकरविरुद्ध काम करते. Hpv ६,११, १६, १८, ३१, ३३, ४५, ५२, ५८ प्रकारांवर काम करते.
